जेऊरवाडी  येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींना नशा मुक्त अभियान

करमाळा प्रतिनिधी

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शाळेमध्ये नशा मुक्त भारत अभियान आयोजित करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा जेऊरवाडी तालुका करमाळा येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींना नशा मुक्त अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले. उत्तम आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम,सकस आहार शाळेचा अभ्यास आणि कोणत्याही नशे पासून दूर

राहावे यासाठी वाईट गोष्टी पासून दूर राहिले पाहिजे.

तंबाखु, गुटखा,दारू, सिगारेट, गांजा आदी नशायुक्त पदार्थापासून दूर राहावे आणि निरोगी जीवन बनवावे.या विषयी मार्गदर्शन

केले.

लहापणापासूनच मुलांवर चांगले संस्कार केले तर ते कोणत्याही प्रकारची नशेचा आहारी जात नाहीत व चंगली पिढी घडण्यास

  मदत होईल असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.  किसन कांबळे सर,  समाजसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अमोल रणशुर सरानी सहकार्य केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *