
जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
करमाळा प्रतिनिधी
झरे. श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे मध्ये बालदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ठीक सकाळी 10.00 वाजता झाली.या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे मुलांनी विविध संतांच्या भूमिका साकारल्या होत्या. या मध्ये विठ्ठल, रुक्माई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, चोखामेळा, मुक्ताबाई, व साईबाबा या

भूमिका होत्या.अशा रंगीबेरंगी पोशाखात मुले खूप उठून दिसत होती. शाळेचा परिसर टाळांच्या व ज्ञानबा तुकाराम या आवाजाने दुमदुमून गेला होता. या दरम्यान मुलांना रिंगण करून उभा करण्यात आले होते. रिंगणामध्ये पालखीचे पूजन

शाळेच्या संचालिका डॉक्टर स्वाती बिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या आवर्जून उपस्थित होत्या. तसेच त्यांनी मुलांना अल्पहार उपलब्ध करून दिला. त्यानंतर तानाजी हरणावळ यांच्या हलगीच्या तालावरती मुले व शिक्षक फुगड्या

खेळले. याप्रसंगी सर्व शिक्षक पारंपरिक पोशाखात होते. हा कार्यक्रम मुलांना अल्पाहार देऊन 12 वाजता संपन्न झाला.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे, सहशिक्षक सतीश कोंडलकर, गीतांजली सातव, तानाजी हरणावळ व इतर शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.
