आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदचा सण मुस्लिम बांधवांनी साजरा करावा परंतु कुर्बानी देऊ नये – अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी

करमाळा प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदचा सण मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करावी,परंतु कुर्बानी देऊ नये असे आवाहन मुस्लिम समाज्याचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले. यावेळी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी उपस्थित होते. पुढे बोलताना अध्यक्ष तांबोळी

म्हणाले की, हिंदू धर्मामध्ये एकादशीचे खूप मोठे महत्त्व आहे अख्या देशातून पंढरपूर येथे सर्व भाविक दर्शनासाठी येत असतात याचे महत्त्व आपण सर्व मुस्लिम समाजाने जाणले पाहिजे यामुळे बकरी ईद हा सण गुरुवारी साजरी करावी

परंतु कुर्बानी शुक्रवारी किंवा शनिवारी द्दावी, असे आवाहन अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे.

….

करमाळा तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी एवजी शुक्रवारी बकरी ईदची कुर्बानीचा निर्णय घेतल्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांनी तांबोळी व मुस्लिम बांधवांचे कौतुक करून त्याचे आभार मानले त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *