
मांगी एम. आय. डी. सी. संदर्भातील माहिती घेऊन अभ्यास करून प्रश्न मारगी लावू – खासदार निंबाळकर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा एम. आय. डी. सी. संदर्भातील अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. व्यापारी संमेलन आणि संवाद या कार्यक्रमाचे आयोजन गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे

करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष भाजपा व्यापार आघाडीचे जितेश कटारिया, आदिजण उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले, टेंभूर्णी जातेगाव महामार्गाचे

काम लवकरच चालू होईल, तालुक्यातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागेल, जेऊर येथे रेल्वे थांबा महिना अखेर पर्यंत होईल यामुळे व्यापार वाढेल, असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक मध्ये भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले,

करमाळा मांगी रोडवरील एम. आय. डी. सी. चालू करण्यात यावी, जेऊर रेल्वे थांबा मुळे व्यापारी व नागरीकांना पुणे मुंबईला जावे लागते, मांगी, दहिगाव, कुकडी पाण्याचे नियोजन आदि समस्या खासदार यांनी मार्गी लावाव्यात, असे चिवटे यांनी

सांगितले. यावेळी सोमनाथ चिवटे, अमोद संचेती, भाजपचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, दिपक चव्हाण, बाळासाहेब कुंभार, संजय आण्णा घोरपडे, श्याम सिंधी, बाळासाहेब होसिंग, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, दासाबापु बरडे, अमोल

पवार, नितीन झिंजाडे, विष्णू रणदिवे, मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील, हर्षद गाडे, किरण शिंदे, किरण बागल, ठोंबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, तालुक्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.