
स्नेहालय स्कूल मध्ये उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला
करमाळा प्रतिनिधी
जय जय राम कृष्ण हरी….ज्ञानोबा माऊली….माऊली…तुकाराम,तुकाराम …असा अंखड घोष अन् टाळ – मृदंगाचा गजर करीत बालदिंडी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमधील छोटया विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रीतपणे येऊन विद्दयालयातुन दिंडी काढली होती. तसेच हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक झाडे लावा-झाडे जगवा,मुली वाचवा-देश वाचवा,सुंदर स्वच्छ

शहर,पाणी वाचवा जलसंवर्धन करा असे संदेश देणारे फलक हातात घेतले होते.विदयार्थ्यांनी ‘नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे!फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे !! कमरे वरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू! असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला होता. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल

रूक्मिनी,मुक्ताई,डोक्यावर तुळशी वृंदावन, गळयात माळा विविध संतांची वेशभूषा करून दिंडी करमाळा शहरातील प्रमुख मारगा वरून काढण्यात आली होती.हा सोहळा स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांच्या

मार्गदर्शनाखाली काढण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका ,कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले होते.यावेळी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
….
स्कूल जवळपास दिंडी आल्यावर रिंगण सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी विद्द्यार्थ्यांनी,पालकांनी, शिक्षिकांनी

फुगडी,अंभग,भारूडचा कार्यक्रम साजरा केला होता.