रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरणार – मंगेश चिवटे

वीट  प्रतिनिधी

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी महत्वाची ठरणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ करमाळा तालुक्यातील जनतेला घेऊन देऊ व हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिले.

वीट आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रिटेवाडी उपसा सिंचन योजना अंतर्गत येणाऱ्या जवळपास 12 गावांच्या सरपंचांनी ही योजना मंजूर करावी म्हणून निवेदन चिवटे यांना दिले. यावेळी वीट विकास फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.

जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंहराजे भोसले सदस्य बिभिशन आवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, या उपसा सिंचन योजनेमुळे करमाळा तालुक्यातील 30000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात संवेदनशील आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा खाते आहे.

दोघांकडे आग्रह धरून आपण ही योजना मंजूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. कुठलाही गट तट पक्ष न पाहता किंवा याचे राजकीय श्रेय कुणाला जाईल याचा विचार न करता केवळ करमाळा तालुक्यातील जनता व शेतकरी सुखी होईल या भूमिकेतून सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी येणे गरजेचे आहे.

लवकरच आपण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची करमाळा तालुक्यातील जनतेला भेटण्याची वेळ घेणार असून तारीख व वेळ जाहीर झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील या लाभक्षेत्रात येणारे शेतकऱ्यांनी ज्याला जमेल त्यांनी हे निवेदन देण्यासाठी यावे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते असून यापूर्वीच त्यांनी आपल्या मोबाईलवरून संबंधित अधिकाऱ्यांना रिटेवाडी उपसा सिंचन योजना चा अहवाल करून याचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे मांडण्याच्या सूचना दिले आहेत.

उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी करमाळ्याचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शब्द दिला आहे. बिभिशन आवटे जिल्हा परिषद सदस्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मंगेश चिवटे यांनी ही योजना पूर्ण करावी. तालुक्यातील जनता ही एकनाथ शिंदे यांची उपकार विसरू शकणार नाही. त्यासाठी मध्यस्थ म्हणून चिवटे यांनी काम करावे असे आव्हान केले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *