
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आंदोलनची शासनाने घेतली दखल लवकरच तालुक्या साठी येणार नवीन तहसीलदार तसेच सेतू सुविधा केंद्र ई-निवीदा प्रक्रिया सुरु – हनुमंत मांढरे-पाटील
करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील तहसीलदार यांची बदली होऊन जवळ पास तीन महिने झाले तरी देखील करमाळा तालुका साठी नवीन तहसीलदार नियुक्ती केली जात नाही. जाणिवपूर्वक राजकीय द्वेषा पोटी तालुक्यातील जनतेला हे सरकार वेठीस धरण्याचं

काम करत आहे. तसेच शासकीय सेतू सुविधा केंद्र देखील जाणिवपूर्वक बंद केल्या मुळे सद्या दहावी बारावी उतीर्ण विद्यार्थी पुढील शैक्षणिक प्रवेश साठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल, रहिवासी दाखला, विविध दाखल्यांची अवश्यकता आसते. परंतु सेतू सुविधा केंद्र बंद असल्या मुळे गैर सोय होत आहे व खाजगी महा ईमेल सेवा केंद्र चालक

विद्यार्थी व पालक यांची आर्थिक लुट करत आहेत पुणे सांगली सातारा येथे सेतू केंद्र चालू आहे मग सोलापूर साठी वेगळा निर्णय का नवीन तहसीलदार यांची नियुक्ती न झाल्यास व सेतू केंद्र चालू न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आंदोलन इशारा दिला होता याची दखल घेत जिल्हा अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन सेतू सुविधा केंद्र चालू करण्याचा

निर्णय घेण्यात आला आहे तसेच ई-निवीदा प्रक्रिया सुरु केली आसून लवकरच सेतू सुविधा केंद्र चालू होणार आहे. त्याच प्रमाणे येत्या 27-28 तारीख पर्यंत नवीन तहसीलदार नियुक्ती करण्यात येणार आहे. आशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे.
