
खासदार निंबाळकर शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलत आहेत-अध्यक्ष देवानंद बागल
करमाळा प्रतिनिधी
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत त्यांना

डावलून विविध विकास कामात सहभागी करून घेत नाही. अशी खंत शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्रात एकत्रित विकास कामे

करीत आहेत. त्याच पद्धतीने इतर मतदार संघात खासदार आमदार पदाधिकारी कामे करीत आहे. फक्त माढा मतदार संघाचे खासदार विज,पाणी,रस्ते आदि विकास कामांबाबत पुणे करमाळा येथे बैठका घेतात. ते पण फक्त भाजपाच्या पदाधिकारी

यांना बोलवून घेत आहे शिवसेनेच्या कुठल्याच पदाधिकारी यांना बोलवत नाही. खासदार यांना शिवसेनेच्या मतदारांची गरज नाही असे वाटत आहे. मी सध्या पदाधिकारी आहे मांगी येथे राहतो मध्यंतरी पुणे येथे पाण्या बाबत बैठक झाली आम्हाला

कोणाला बोलवले नाही ही मोठी शोकांतिका आहे असे कित्येक वर्ष झाले. शिवसेना पदाधिकारी यांना ते डावलत आहेत याबाबत वरिष्ठांना आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी भेटुन सांगणार आहे असे अखेर शिवसेना प्रमुख देवानंद बागल यांनी सांगितले आहे.
