
विविध विकास कामांचे आमदार शिंदेच्या हस्ते भूमीपूजन
करमाळा प्रतिनिधी
राजूरी तालुका करमाळा जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा

भूमिपूजन समारंभ व राजूरी ते वाशिंबे रस्ता व राशीन ओढयावरील पुलाचा लोकार्पन सोहळा करमाळा तालुका आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बारामती अॅग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी

भूषविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजूरी सरपंच डाॅ. अमोल दुरंदे यांनी केले तर देविदास सारंगकर, नंदकुमार जगताप, संतोष दादा अनभुले, सुहास गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत साखरे यांनी केले. धनराज निलचंद दुरंदे नीट परिक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल व उत्कृष्ट पध्दतीने वायरमनचे काम केल्याबद्दल दत्तात्रय फरांडे यांचा

सन्मान करमाळा तालुका आमदार संजयमामा शिंदे व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. आपपासाहेब निरगुडे यांचा वाढदिवस देखील करण्यात आला. या वेळी उध्दव दादा माळी, तानाजी बापू झोळ, संभाजी माळी, संतोष दादा अनभुले, भरत खाटमोडे, सतिश शेळके, हनुमंत भोसले, सुभाष अभंग , सुहास गलांडे, डाॅ .गोरख गुळवे, सुरज ढेरे, शंकर जाधव, गणेश

गुंडगिरे, बंडू नवले, देविदास सारंगकर, रामेशवर गलांडे, कॉनट्रक्टर काळे, शेळके व इतर मान्यवर ग्रामस्थ, नागरिक, युवा वर्ग राजूरी उपस्थित होते. राजूरी, सावडी, कोर्टी, कोंढार चिंचोली, वाशिंबे, पारेवाडी, टाकळी (क) मांजरगाव, उंदरगाव, दिवेगवहाण या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते .
