राहूरी तालुक्यातील ताहाराबाद येथील भक्ताकडून श्री कमलादेवी मंदिर समितीस रू. 50,151 ची देणगी

करमाळा प्रतिनिधी  

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सध्या करमाळा परिसरात वैष्णवांचा मेळा जमला आहे. या निमित्ताने ऐतिहासिक श्री कमलाभवानी मंदीरातही भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. पंढरीच्या वाटेवर असणारे श्री कमलाभवानी मंदिर नेहमीच

वारक-यांचे आकर्षण ठरले आहे. अशातच नगर जिल्ह्यातील श्री कमलाभवानी भक्त सुधाकर औटी रा. ताहाराबाद (ता. राहूरी) यांच्याकडून मंदिर समितीस रु.50,151/- (रु. पन्नास हजार एकशे एक्कावन) देणगी प्राप्त झाली आहे.

औटी हे गुरुवार दि. २२ रोजी श्री कमलाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनावेळी मंदीर परिसराची भव्यता आणि पुरातन वारसा पाहून औटी भारावून गेले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर समितीचे सचिव अनिल पाटील, व्यवस्थापक अशोक गाठे तसेच मंदिर पुजारी व वारकरी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *