
मकाई सहकारी व कमलाई लिमिटेड साखर कारखान्यांचे थकीत एफ. आर. पी. व्याजासहित शेतकऱ्यांना मिळावी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी व कमलाई लिमिटेड साखर कारखान्यांचे थकीत एफ. आर. पी. व्याजासहित शेतकऱ्यांना मिळावी, या बाबतचे निवेदन तहसीलदार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले आहे.

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या जीवावर उभा राहिलेले साखर कारखाने असून. या कारखान्यांचा 2022-23 गाळप हंगाम पूर्ण झालेला आहे. या कारखान्याकडे शेतकऱ्यांची एफ. आर.

पी. व वाहन मालक यांचे कमी जास्त 40/45 कोटी पर्यंत देणे बाकी आहे. तरी शेतकऱ्यांची एफ. आर. पी. ही 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असून. जर त्या कारखान्याने 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांची एफ. आर. पी. दिली नाही, तर पुढील

दिवसाची 14 टक्के प्रमाणे व्याज हे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे, परंतु हंगाम संपून तीन ते चार महिने उलटले तरीही शेतकऱ्यांची बिले घेण्यात आलेली नाहीत. तरी त्या कायद्याअंतर्गत मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई प्रा.लि.

साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांची देणे लवकरात लवकर व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे व शेतकऱ्यांची देणे व्याजासहित न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरील व कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे.
