
आदित्य यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना चहापाणी
करमाळा प्रतिनिधी
शिवसेना 57 व्या वर्धापन दिनानिमित्त व मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त करमाळा तालुका युवा सेना व शिवसेना यांच्या वतीने करमाळा नगरी मधे येणारया सर्व वारकरी संप्रदाय भक्तांचे स्वागत करुन करमाळा शहर पाणी

पुरवठा टाकी करमाळा ते जेऊर रोड येथे पंढरपुर कडे आषाढी एकादशी निमित्त पायी चालत जाणाऱ्या वारकरी संप्रदाय भक्तां साठी चहाची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे आयोजन करमाळा युवासेना तालुका समन्वयक कुमारभैया माने यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा सचिव आदेश बागल, करमाळा शहर युवा सेना ऊपशहरप्रमुख आदित्य जाधव, नितीन परदेशी,

नवनाथ माने, लखन ननवरे, निलेश पवार, बुवासाहेब धनवे, सागर माने, राहुल घाडगे, ख्वाजा कुरेशी, गालीब कुरेशी व इतर सदस्य उपस्तिथ होते.

