
परिस्थिती निर्माण झाल्यास विधानसभा लढू, 2019 ला राष्ट्रवादीची ऑफर होती – प्राध्यापक रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ बचाव समितीच्या प्रयत्नामुळे आदिनाथ कारखाना सहकार तत्त्वावरच राहिला आहे. आता निवडणूक लागली की अनेकांना स्वतःच्या राजकारणासाठी आदिनाथ कारखाना ताब्यात हवा आहे. मात्र आदिनाथ बचाव समिती एक सक्षम पर्याय जनतेपुढे देण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा बचाव समितीचे सदस्य प्राध्यापक रामदास झोळ यांनी केला.

करमाळा विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना प्राध्यापक रामदास झोळ करत म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी माझ्याशी संपर्क करून विधानसभा लढवण्याची ऑफर दिली होती. दरम्यानच्या काळात शेवटच्या पंधरा दिवसात घडलेल्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीने पर्याय बदलला मात्र येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत परिस्थिती निर्माण झाली तर निवडणूक लढविण्याचा विचार करू असा दावा केला.

सध्या करमाळा तालुक्यात राजकारणात मोठी स्पेस निर्माण झाली असून स्वार्थाच्या व गटातटाच्या राजकारणामुळे तालुका मागे पडला आहे.
शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात कोणतीही प्रगती झाली नाही. करमाळा तालुक्याचे विकासाचे मॉडेल निर्माण करण्यासाठी धोरणात्मक रचनात्मक काम झाले नाही.
यामुळे इथून पुढील काळात चांगले विचाराची लोक बरोबर घेऊन समाजसेवक बरोबर राजकारण करण्याचा मनोदय व्यक्त केला. याशिवाय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जर आमच्या प्रभागातील आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या आली तर निश्चितपणे निवडणूक लढवणार असे स्पष्ट केले.

प्राध्यापक रामदास झोळ हे दत्तकला शिक्षण संस्था भिगवण येथील चेअरमन असून वाशिम येथील रहिवासी आहेत. त्यांचा करमाळा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन कारखान्याचे रिपेरिंग साठी स्वतःच्या खिशातले दहा लाख रुपये दिले होते.
जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी मायाताई झोळे यांचा पराभव झाला होता. शिवाय नुकत्याच झालेल्या वाशिम मी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची त्यांच्या गटाचा पराभव झाला होता.
याबाबत त्यांना बोलते केले असता ते म्हणाले की, मी पराभवानी खचून जाणारा माणूस नाही, दत्तकला शिक्षण संस्था उभा करताना सुद्धा मला प्रचंड अडचणी आल्या पण आता एक नामांकित संस्था म्हणून महाराष्ट्रात आमच्या संस्थेचे नाव निघत आहे. सत्ता मिळवणे हा माझा उद्देश नसून करमाळा तालुक्यात विकासाची गंगा आणणे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी खारीचा वाटा उचलणे यासाठी मी प्रयत्न करत आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडूननिवडणूक लढवली असती तर माझा पराभव झाला असता हे माहीत असून सुद्धा मी ही निवडणूक लढवणार होतो मी पराभवाची कधीही चिंता करत नाही.
आदिनाथ कारखाना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुळेच वाचला याचा मी पुनरुचार करत असून ज्यांनी मदत केली त्यांचे नाव घेणे हे आपले काम आहेत येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा प्राध्यापक तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांना विश्वासात घेऊनच आदिनाथ चे निवडणुकीचे कामकाज करू असे सांगितले.