
कुर्डुवाडी भाजपा महिला आघाडी हलगी मोर्चा काढणार…
कुर्डुवाडी प्रतिनिधी
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळ्यासह परिसर सुशोभीकरण करावा अन्यथा कुर्डुवाडी भाजपा महिला आघाडी हलगी मोर्चा काढणार.
कुर्डूवाडी शहरातील एकमेव असणारा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व परिसर अनेक वर्षापासून सुशोभीकरणाविना दुर्लक्षित आहे. नगरपरिषदेने तात्काळ अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व परिसर सुशोभीकरण करावा.

अन्यथा 23 मे रोजी नगरपरिषद कार्यालयावर कुर्डुवाडी शहर भारतीय जनता पार्टी महिला घाडीच्या वतीने हलगी मोर्चा काढणार असल्याचे इशाराचे निवेदन कुर्डुवाडी शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने निवेदन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना सोमवारी देण्यात आले.

यावेळी कुर्डूवाडी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा प्रतीक्षाताई गोफणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश पाटील, तालुका सरचिटणीस सुधीर भाऊ गाडेकर, भाजपा अल्पसंख्यांक सेल शहरअध्यक्ष बालाजी गायकवाड, उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महिला आघाडीच्या शहर ऊपाध्यक्षा साक्षी गायकवाड, शहर सरचाटणीस स्वाती गोरे, शहर ऊपाध्यक्षा पद्मावती दातार, अंजना कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
