
महिलांचा नगरपालिकेवर शिवसेनेचा घागर मोर्चा
करमाळा प्रतिनिधी
शहरातील रंभापुरा भागात गेली चार दिवसापासून पाणी नसल्यामुळे आज महिलांनी आपला संताप व्यक्त करत सकाळी सात वाजता करमाळा नगरपालिकेवर बोंबाबोंब आंदोलन केले.
रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या महिलांनी नगरपालिकेपुढे वार्डातील समस्यांचा पाढाच वाचला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मुख्याधिकारी लोंढे यांनी प्रश्न तात्काळ न सोडवल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा दिला.

रंभापुरा भागात केवळ एका दिवसा आड फक्त पंधरा मिनिट पाणी येते केवळ 3 ते 4 हांडे पाणी भरल्यानंतर पाणी निघून जाते. पाणीपुरवठा योजना खराब झाल्यामुळे महिलांचे प्रचंड हाल होत आहेत.
घरात काम करून मोलमजुरीसाठी शेतात जाणाऱ्या महिलांचे प्रचंड हाल होत आहेत.
यावेळी पाणीपुरवठा अधिकारी कमलाकर भोज टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

मात्र महिलांनी आश्वासन मान्य केले नाही कारण टँकर आला की महिलांची प्रचंड भांडणे होतात व पाण्यावरून मोठे वाद होऊन पोलीस केसेस होतात, यामुळे नळालाच पाणी येण्याची व्यवस्था करावी असा आग्रह धरला.
यावेळी तोडगा काढत आज सायंकाळी 6 वाजता उच्च दाबाने पाणी सोडण्याचे आश्वासन कमलाकर भोज यांनी दिले.
एवढी या प्रभागातील शौचालयात पाणी साठवण्यासाठी तात्काळ 2000 लिटरची पाण्याची टाकी बसवण्याचे आदेश शेख साहेब यांनी दिले.

मुख्याधिकारी लोंढे यांना या प्रकाराबद्दल कोणतीच माहिती नव्हती ज्यावेळेस हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज याबाबत बैठक घेऊन रंभापुरा भागातील सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.
भागातील गटारी प्रचंड तुंबलेले असून यामुळे रोगराई वाढली आहे.
या भागातील नगरसेवक फक्त मते मागायला येतात असा आरोप पद्मिनी जाधव यांनी केला.
या आंदोलनात वैशाली गोळे, संगीता चव्हाण, लक्ष्मी करंडे, सुरेखा चव्हाण, लक्ष्मी कदम, वैशाली करंडे, छाया लोंढे, अलका कवडे, अक्का जाधव, सोनाली तांबे, आशा साळुंखे, अशोक पवार, सुनीता पवार, अलका बोलभट, मेजर बोलभट, रमेश पवार, सोनाली पवार, स्वाती करंडे, विकी करंडे, मीना करंडे, शिवाजी तांबे, सार्थक चव्हाण, संजय राखुंडे, मीरा जाधव, शोभा पवार, कीर्ती चव्हाण, आदि महिला सहभागी झाल्या होत्या.
निलेश चव्हाण, शाखाप्रमुख शिवसेना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका बाजूने राज्यात चांगला कारभार करून सर्वसामान्यांना मदत करताना करमाळा नगरपालिकेचे अधिकारी मात्र रंभापुरातील नागरिकांच्या आरोग्य समस्या पाण्याच्या समस्या स्वच्छतेच्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या आठ दिवसात या सर्व समस्यांना सोडल्या नाही तर, करमाळा नगरपालिकेसमोर सर्व महिलांना सोबत घेऊन हलगी नाद करू असा इशारा शाखाप्रमुख निलेश चव्हाण यांनी दिला आहे.