सुभाष गुळवेंमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार – मा चेअरमन राजेंद्र पवार
कमलाई नगरी
मकाई,भैरवनाथ,कमलाई या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे नोव्हेंबर पासून लोकांची बिले दिलेली नाहीत सुभाष गुळवे यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी माहिती वि का से सो मा चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली आहे. बारामती अँग्रो कारखान्याचे उमरड,चिकलठाण येथे सुभाष गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आँफिसचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी पोपळज सरपंच कल्याणराव पवार आदिनाथचे माजी चेअरमन वामनराव बदे,अँड अजित विघ्ने, मानसिंग खंडागळे श,राजाभाऊ कदम,तात्या सरडे आदिमान्यवर व भागातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की,
सुभाष गुळवे यांचे शेतकरी हीताचे चांगले नेतृत्व आहे लोकांच्या कामी पडणारे नेतृत्व आहे बारामती ॲग्रो कारखान्याचे पहिला दहा हजार टनि होता आता तो कारखाना 20000 टनि झालेला आहे त्या कारखान्याची क्षमता वाढल्यामुळे तालुक्यातील बहुतांश ऊस कारखाना गाळप करणार आहे पश्चिम भागातील ऊस हळगाव कारखाना देखील घेणार आहे तो ही कारखाना सुभाष गुळवे यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे हळगाव कारखाना तो देखील आ रोहित पवार यांनी घेतलेला आहे त्याला देखील अँग्रो कारखाना प्रमाणे पेमेंट केले जाईल सर्व शेतकरी ऊस उत्पादक या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बारामती कारखान्याला जाण्यासाठी तालुक्याचे नेते आ संजयमामा शिंदे यांनी डिकसळ पुलाचे काम मार्गी लावलेले आहे त्या कामाचे टेंडर देखील झालेले आहे लवकरात लवकर तेही काम चालू होईल पुण्याला जाण्याचा मार्ग पश्चिम भागातील लोकांचा जो मोठा प्रश्न होता तोही संजय मामांनी मार्गी लावलेला आहे असे मत राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *