
आदिनाथ कारखान्यास सरफेसी कायदया अंतर्गत नोटीस
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यास कर्जदार सरफेसी कायदया अंतर्गत वैधानिक तीस दिवसाची साखर विक्री नोटीस सहाय्यक व्यवस्थापक प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी आज प्रसिध्द केली आहे. कारखान्याकडे साखरसाठा उत्पादीत गाळप हंगाम लाँट अ 2017-2018 व 2018-19 लाँट ब जमीनीवर चिकटलेली साखर व पाक झालेली 4255 आहे मालतारण

येणेबाकी राज्य बँक रूपये 4208.72 लाख आहे. कर्जदार जामीनदार यांना सुचित करण्यात येते की राज्य सहकारी बँकेच्या निविदा फॉर्म मध्ये नमूद साखर मालतारण कर्ज येणे बाकीचा भरणा निविदा उघडणे पूर्वी करावा अन्यथा जप्त साखरेची विक्री करून कर्ज वसुली केली जाईल. तसेच विक्री प्राप्त रकमेतून संपूर्ण वसुली न झाल्यास उर्वरित कर्ज बाकी व्याज व इतर खर्चासह आपणाकडून वसुली केली जाईल असे सहाय्यक व्यवस्थापक प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी म्हटले आहे.

