करमाळा प्रतिनिधी

दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर दि. 20/07/2026 रोजी शांततेच्या मार्गाने विध्यार्थी आंदोलन करत असताना  त्याच्यावर सरकारने अश्रूधुर व लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ उद्या दि. 23 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तरी करमाळा तालुक्यात उद्या कडकडीत बंद राहील. याची सर्व व्यावसायिक व व्यापारी वर्गाने नोंद घ्यावी.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड विलासराव कांबळे, जि. उपाध्यक्ष उमेश पोळ, मच्छिंद्र चव्हाण, जि. संघटक देविदास भोसले, ता. अध्यक्ष प्रा. नवनाथ साळवे, ता. महासचिव नंदू कांबळे, ता. महिला अध्यक्षा जयश्री सावंत, ता. कामगार अध्यक्ष विठ्ठल मोरे, ता. संघटक बाळासाहेब कांबळे, ता. उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते सुहास ओहोळ, सक्रिय कार्यकर्ते अतुल कांबळे आदी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *