करमाळा प्रतिनिधी

मकाई सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर लगेचच विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी मागील दाराने प्रवेश करुन दिग्विजय बागल हे मकाईचे चेअरमन होतील असा खळबळजनक दावा आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची सहकारी संस्था असलेल्या मकाई सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या प्रक्रिया मधील

एक घटक असलेल्या रोलर पुजनाचा कार्यक्रम नुकताच झाला. यानंतर आमदार नारायण आबा पाटील गटाकडून तळेकर यांनी चेअरमन बदलाचा दावा करुन सहकारी क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, मुळात मकाई सहकारी साखर कारखान्याची सुत्रे बागल कुटुंब आपल्या हातुन जाऊ देत नाही हा इतिहास आहे. यातच मागील संचालक मंडळ निवडणुकीत तीव्र इच्छा असुनही तांत्रिक अडचणी आल्याने व उमेदवारी अर्ज भरण्यास पात्र नसल्याने बागल बहिण-भाऊ हे संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकी पासुन दुर राहिले. परंतु आता मकाई सुरु होणार

असे दिसताच विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांना हटवले जाणार हे नक्की आहे. कारण आदिनाथ कारखान्याच्या बाबतीतही बागल कुटुंबाचे हेच धोरण बघायला मिळाले. आदिनाथ डबघाईला आल्यावर धनंजय डोंगरे यांना पदावरुन दूर केले नाही. त्यांच्या हातुन बारामती एग्रोला कोर्टात खेचण्याचे काम केले. परंतू या अगोदर आदिनाथ कारखान्याचा कारभार चांगल्या प्रकारे करुन कारखाना सुस्थितीत आणत असतानाच तत्कालीन चेअरमन संतोष पाटील यांचा राजीनामा बागल कुटुंबाने घेतला होता. याचीच पुनरावृत्ती आता मकाई कारखान्याच्या संचालक मंडळात दिसुन येईल. जोपर्यंत कारखाना

संकटात आहे तोपर्यंत विरोधकांच्या टिकेला तोंड देण्यासाठी दिनेश भांडवलकर यांचा उपयोग बागल यांनी केला. परंतु आता सर्वकाही सुव्यवस्थित असताना बागल कुटुंबातील व्यक्तीच चेअरमन होणार हे मात्र नक्की आहे. मकाई आणि आदिनाथच्या चेअरमन पदाबाबत बागल कुटुंबाचे धोरण स्वार्थी असेच राहीले. किंगमेकर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या विलासराव घुमरे सरांनाही बागल बहिण भाऊ यांनी मकाईचे चेअरमन होऊ दिले नव्हते यामुळे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर हे सुध्दा लवकरच पदाचा राजीनामा देतील असा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *