करमाळा प्रतिनिधी  

दिनांक 11 जुलै रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्र व भूगोल विभागाच्या वतीने  जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्याने काहीतरी कौशल्य विकसित करून देशासाठी

योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी अर्थशास्त्र व भूगोल विभागातील विश्वंभर लांडगे, सलमा पठाण, शबाना पठाण, शुभम देशमाने व कृष्णा पवार या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक व आय. क्यू. ए. सी. चेअरमन डॉ.अंकुश करपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजया गायकवाड,

मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विनायक खरटमल, प्रा. प्रमोद शेटे, प्रा. गौतम खरात, प्रा. सुधीर मुळीक, प्रा. हर्षद जाधव, प्रा. महेश जगताप हे उपस्थित होते. यावेळी अर्थशास्त्र व भूगोल विभागातील सर्व विद्यार्थी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर सुपेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *