करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केम येथील डॉक्टर दादासाहेब यांनी गंभीर गुन्ह्यातून आरोपींना वाचवण्यासाठी आरोपीस खोट्या वैद्यकीय कारणावरून रुग्णालयात दाखल करून गंभीर दुखापतीचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याच्या कारणावरून डॉक्टरांवर गंभीर व्यावसायिक गैरवर्तनाची रीतसर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्यांच्या हॉस्पिटलची नोंदणी रद्द व्हावी अशी मागणी केम येथील प्राध्यापक डॉक्टर भारत बापू बिचितकर यांनी एका निवेदनाद्वारे सिव्हिल सर्जन तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे मॅडम यांच्याकडे केली आहे.

केम येथील प्राध्यापक डॉक्टर भारत बापू बिचितकर यांनी सिव्हिल सर्जन यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की केम येथील डॉक्टर दादासाहेब माने यांचे मालकीचे यशश्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे रुग्णालय सध्या कंदर येथे कार्यरत आहे डॉक्टर माने यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिक नियमाचे उल्लंघन करून गंभीर गुन्ह्यातील आरोपी शंकर रामचंद्र तळेकर राहणार केम यास खोट्या वैद्यकीय कारणावरून रुग्णालयात दाखल करून त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.

यातील आरोपी शंकर रामचंद्र तळेकर हा 7 एप्रिल 2026 रोजी मला जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर केलेल्या खुनी हल्ल्यातील एक आरोपी आहे माझ्यावर झालेल्या सदर हल्ल्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन करमाळा येथील पोलीस दप्तरी दिनांक 8 मे 2000 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे सदर हल्ल्याच्या वेळी झालेल्या भांडणात आरोपीस कोणतीही मारहाण अथवा दुखापत झालेली नाही तरीदेखील डॉक्टर हे आरोपीचे हित संबंधित असल्यामुळे त्यांनी वरील आरोपीस वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक नसतानाही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतल्याचे खोटे कागदपत्र तयार करून त्यांना उपचार घेत असल्याचे बनावटपणे दाखवले आहे असे निवेदनात म्हटले आहे आरोपीला कोणतेही गंभीर दुखापत झाली नसताना ते त्यांचे हॉस्पिटल मध्ये गंभीर दुखापतीवर 27 एप्रिल 2026 पासून दिनांक 9 मे 2026 पर्यंत उपचार घेत असल्याचे गंभीर दुखापतीचे चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेले आहे त्यासाठी सदर डॉक्टरांनी बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या अनेक वैद्यकीय नोंदी तयार केल्या आहेत असे निवेदनात बिचितकर यांनी म्हटले आहे तेव्हा सदर डॉक्टरांनी डॉक्टरांनी केलेला वरील गैरप्रकार हा वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता व कायदेशीर जबाबदारीच्या विरोधात आहे त्यामुळे सदर डॉक्टरांनी केलेल्या या गैर कृत्याची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर आवश्यक ती शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करून सदर हॉस्पिटलची नोंदणी रद्द करण्यात यावी अशी शेवटी मागणी प्राध्यापक बिचितकर यांनी केली आहे निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव नोंदणी अधिकारी तथा सचिव महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई यांच्याकडे पाठवले आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *