करमाळा प्रतिनिधी

करमाळा मतदार संघातील रस्ते दुरुस्ती साठी आठ कोटी पन्नास लाख रुपये मंजुर झाले असुन सदर कामाच्या निवीदा प्रक्रिया सुरू झाली असल्याने लवकरच ही सगळी कामे सुरू होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील अनेक रस्ते नादुरुस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यासाठी विशेष बाब म्हणून आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे निधीची मागणी केली होती. यावर पालकमंत्री यांनी तात्काळ साडे आठ कोटी रुपये मंजुर केल्याने आता खालील कामे मार्गी

लावली आहेत. यामध्ये १) मांगी-पोथरे-निलज सा.क्र.०/०० ते ७/०० ता. करमाळा ग्राम-२७ (रक्कम ५० लक्ष) २) पाथुर्डी ते वरकुटे रस्ता सा.क्र.०/०० ते १/०० ता. करमाळा ग्रामा-२९६ (रक्कम ५० लक्ष) ३) वीट ते चोपडे वस्ती सा.क्र.०/०० ते ४/०० ता. करमाळा ग्राम-२३० (रक्कम ५० लक्ष) ४)आवाटी-नेरले-मुंगशी ते रोपळे रस्ता सा.क्र.०/०० ते ६/०० ता. करमाळा इजिमा १० (रक्कम ५० लक्ष) ५) वरकुटे ते साडे रस्ता सा.क्र ०/०० ते ४/०० ता. करमाळा ग्रामा-९३ (रक्कम ५० लक्ष) ६) केडगाव ते शेटफळ सा.क्र.०/०० ते ४/५०० ता. करमाळा ग्राम ६४ (रक्कम ५० लक्ष) ७) झरे-घाडगे वस्ती ते प्र-१२६ सा.क्र.०/००ते २/०० ता. करमाळा ग्राम-१४५ (रक्कम ५० लक्ष) ८)केडगाव-कुष्ठरोग कॉलनी रस्ता सा.क्र.०/०० ते २/५०० ता. करमाळा ग्रामा-१४९ (रक्कम ५०

लक्ष) ९)बोरगाव ते निलज सा.क्र.०/०० ते २/०० ता.करमाळा ग्राम-८१ (रक्कम ५० लक्ष) १०) सौंदे-फिसरे सा.क्र.०/०० ते ३/५०० ता. करमाळा ग्राम-३९ (रक्कम ५० लक्ष) ११)कुगाव ते कोकरे वस्ती सा.क्र.०/०० ते १/५०० ता. करमाळा ग्राम १२९ (रक्कम ५० लक्ष) १२)प्ररामा ८ भाळवणी ते केम रस्ता सा.क्र.०/०० ते १२/०० ता. करमाळा इजिमा ७७ (रक्कम ५० लक्ष) १३) सांगवी ते प्ररामा ८ प्रजिमा १२ ते सातोली रस्ता सा.क्र.०/०० ४/०० ता. करमाळा इजिमा-१११ (रक्कम ५० लक्ष) १४) गोयेगाव ते

जोडरस्ता सा.क्र.०/०० ते ३/०० ता.करमाळा ग्राम-७५ (रक्कम ५० लक्ष) १५) खातगाव ३ जोडरस्ता सा.क्र.०/००ते २/०० ५०,०० ता. करमाळा ग्रामा १०७ (रक्कम ५० लक्ष) १६) कामोणे ते रामा १४३ सा.क्र.०/०० ते २/५०० ता. करमाळा ग्रामा (रक्कम ५० लक्ष) १७) निंभोरे ते साडे रस्ता सा.क्र.०/० ५/०० ता. करमाळा ग्रामा ५८ (रक्कम ५० लक्ष) अशा प्रकारे एकुण सतरा रस्त्यांसाठी साडे आठ कोठी रुपये मंजुर झाले असून सहा महिन्यांत कामे पुर्ण होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *