महेश भैया डोंगरे पाटील यांना ‘नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित
मुंबई : माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महेश भैया डोंगरे पाटील यांना ‘नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
मैत्री पीस फाउंडेशन, मुंबई आणि वर्मा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सामाजिक कार्याची तसेच गेल्या १० ते १५ वर्षांपासून मराठा समाजासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत महेश भैया डोंगरे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महेश भैया डोंगरे पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष वर्मा,शरद उकावले, महेश शिंदे, नितीन शिंदे, अक्षय बोरगे, बाळासाहेब पाथरकर, सिद्धू मोटे, गौरव चव्हाण, रमेश शिंदे, प्रमोद दळवी, संदीप नाटकर, विकी उकरांडे, किरण शिंदे, ज्ञानदेव सणस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *