सोलापूर, दि. १७ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मानवी रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला. या उपक्रमात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

यावेळी सह आयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, सहाय्यक महसूल अधिकारी परमेश्वर कांबळे, सहाय्यक महसूल अधिकारी विलास रणसुभे, महसूल सहाय्यक सम्राट कोळी, महसूल सहायक गंगाधर हाके, अविनाश स्वामी, श्रीकांत घुगे, शेखर सुरवसे आदी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि प्रशासनाच्या विविध उपक्रमांबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. मानवी रांगोळीच्या माध्यमातून अभियानातील संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *