शहरातील विविध प्रश्नांवर वैभवराजे जगताप आक्रमक.
करमाळा – शहरात गणरायाचे आगमन होऊन चार दिवस झाले तरी अद्याप नगरपालिकेने रस्त्याची दुरुस्ती केली नाही.गणपती विसर्जन होण्याआधी जर रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिला आहे. यासोबतच शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सणासुदीच्या दिवसांत आणि उजनी धरण शंभर टक्के भरले असून सुध्दा कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. शहरात सगळ्या प्रभागात समान पाणी पुरवठा करणे आवश्यक असताना पाणी पुरवठ्यात सुद्धा राजकारण करण्याचे पाप सत्ताधारी आणि प्रशासन दोघे मिळून करत आहेत. दहिगाव येथे नवीन मोटारी बसवण्याच्या कामाची मुदत संपली असून सुध्दा फक्त मर्जीतल्या ठेकेदाराला सांभाळण्यासाठी त्याच्यावर कसलीच कारवाई केली जात नाही. तरी संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ न देता त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर नगरपालिकेला टाळे ठोकण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा वैभवराजे जगताप यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *