करमाळा प्रतिनिधी

 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्री कोटलिंग प्रतिष्ठान संचलित कोटलिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिखलठाण या प्रशालेमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील इयत्ता पहिली इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

सर्वप्रथम जागतिक योग दिनाबद्दल विद्यार्थ्यांना हराळे सर यांनी माहिती सांगितली. तसेच रोकडे मॅडम व ननवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, पद्मासन, वृक्षासन, ताडासन, भुजंगासन अशा वेगवेगळ्या योगाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दिले. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षकांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *