करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील कंदर-सातोली हा अडवलेला शिवरस्ता तातडीने दुरुस्त करावा म्हणून याच रस्त्यावर आत्मदहन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता त्यानुसार आज आत्मदहनाचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र शासनाने पानंद रस्ते, शिवरस्त्याबाबत शासन निर्णय (जीआर) जारी केलेले आहेत. त्यामध्ये मुख्यतः शेत रस्ते, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, शिवरस्ते आणि पाऊल रस्त्यांच्या हक्काबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद-विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य तो आदेश आणि निर्णय देण्याचे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत. मात्र तहसीलदारांनी हा प्रश्न न सोडवल्याने शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. कंदर सातोली हा शिवरस्ता पारंपारिक असून या रस्त्यावर आमच्या शेत, घर व शाळा आहे. परंतु गेल्या तीन वर्षापासून या रस्त्यावर काही संबंध नसणाऱ्या लोकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची अडवणूक करून येथे असणाऱ्या ओढयातील वाहून गेलेला रस्ता भरण्यास अडथळा केला आहे. त्याचप्रमाणे पुढे जाणारा हा रस्ता काही जणांमुळे हा रस्ता बंद पडला आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी यांच्याकडे २०२३ पासून तक्रार करूनही अद्यापपर्यंत या रस्त्याची पाहणी करण्यात आलेली नाही.

२०२३ सालापासून आम्ही घराकडे आणि शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्याकरिता तहसीलदार, प्रांत यांच्याकडे मागणी करत आहोत. मात्र आमचा हा प्रश्न सोडवला जात नाही. आम्हाला आमचा हक्काचा रस्ता करून मिळावा. याकरिता आम्ही अडवलेल्या रस्त्यावरच आत्मदहन करत आहोत. असे यावेळी नागनाथ चव्हाण यांनी सांगितले. यावेळी करमाळा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना आत्मदहन करू नये म्हणून प्रयत्न केला.

हा रस्ता भरून द्यावा, यासाठी कुटुंबासह याच रस्त्यावर आत्मदहन करणारे नागनाथ चव्हाण, सिद्धेश्वर गोडसे, हनुमंत साळुंके, राजेंद्र जगताप, सचिन जाधव, दशरथ बारबोले, शिवाजी साळुंके, अजित फरतडे, संतोष पवार यांनी पुर्वी सांगितले. या रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *