करमाळा प्रतिनिधी

करमाळा ते घारगाव हद्दीत रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झालेली होती. करमाळा ते घारगाव दरम्यान रस्त्यात ठिक ठिकाणी खड्डे पडलेले होते. आता ट्रॅक्टर मधून ऊस वाहतूक चालू आहे, या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली होती.

सातत्याने सुरू असणारी वाहतूक यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले होते दिवसेंदिवस खड्ड्यांचे आकार आणि खड्ड्यांची संख्या वाढत चाललेली होती त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे त्रासदायक ठरत होते. सोबतच ऊस वाहणारी ट्रॅक्टर सारखी वाहणे या मार्गावरून सातत्याने ये-जा करत आहेत. खड्ड्यामधून ऊस वाहतूक करणारी वाहने जात असताना उसाच्या मोळ्या खाली पडण्याचे प्रकार आणि उसाचे भरलेली ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढलेले होते. रस्त्याच्या अवस्थेला नागरिक वैतागले होते. तत्काळ रस्ता दुरुस्ती व्हावी खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी घारगावच्या मा.सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्राच्या माध्यमातून केली होती. त्याची दखल घेऊन खड्डे बुजवण्याची व्यवस्था दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर चालू आहे. सर्व स्तरातून ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *