करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आयोजित एच.एस.सी. परीक्षा २०२६ (परीक्षा केंद्र क्रमांक ०४२१) सुरळीतपणे सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवण्यात आल्या आहेत. यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सामग्री सज्ज करण्यात आली आहे, ज्यामुळे परीक्षा केंद्र सुरक्षित आणि व्यवस्थित राहिले आहे.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हे केंद्र करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे आहे. या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तसेच महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करमाळा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील एकूण ११०४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आणि उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असून, इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरच्या दिवशी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सालाबादप्रमाणे या परिक्षा केंद्रात कॉपी मुक्त परीक्षा राबवून शिक्षणाचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व यंत्रणा यशस्वीपणे काम करत आहेत.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, केंद्र संचालक प्रा. ज्ञानदेव कुंभार आणि अनेक प्राध्यापकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत झाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *