
करमाळा प्रतिनिधी
कौतुकाच्या सर्व सीमा पार… जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर दोन शाळेच्या आणि गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. इंदापूर येथे राज्यस्तरीय कुराश खेळाच्या स्पर्धा पार पडल्या. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर दोन चा विद्यार्थी प्रसाद लक्ष्मण सातव याचा 14 वर्षाखालील 25 किलो वजन गटात प्रथम क्रमांक आला असून त्याची राष्टीय स्पर्धेसाठी निवड झाली. प्रसादचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सतीश बोराडे सर यांचे मुख्याध्यापक पोपळघट सर, चिखलठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख पांडव मॅडम, जेऊर बीटचे विस्ताराधिकारी नलवडे, पं.स करमाळा गटशिक्षण अधिकारी कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ आणि पालक यांनी अभिनंदन केले.
