करमाळा प्रतिनिधी

दिनांक 4/12/2025 रोजी झालेल्या सांघिक खो-खो स्पर्धेमध्ये गतवर्षीच्या गोयेगाव संघास पुन्हा एकदा मात देऊन एक डाव व तीन गुणांनी दणदणीत असा विजय मिळवून विटच्या संघाने सोलापूर येथे होणाऱ्या दिनांक 17/12/2025 लहान गट स्पर्धेमध्ये खो-खो संघ सोलापूर येथे जाणार आहे.

गेल्या वर्षी सांघिक क्रीडा स्पर्धा खो-खो या स्पर्धेचे नियोजन जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट यांनी सोलापूर जिल्ह्याचे लहान गट व मोठा गट मुले खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. भव्य दिव्य असं नियोजन करून ती स्पर्धा उत्तमरीत्या, यशस्वीरित्या पार पाडून गेल्या वर्षीचा विजय संघ प्राथमिक केंद्र शाळा वीटचाच होता.

जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट या शाळेमध्ये शासनाने ठरवून दिलेले विविध उपक्रम अतिशय उत्तमरीत्या राबवून ते पार पाडत असतात. अतिशय नावाजलेली शाळा ही जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट आहे. या शाळेमध्ये गेले दहा वर्षे झाली पटसंख्या टिकून आहे. या शाळेची पटसंख्या 225 च्या आसपास आहे व या शाळेमधील शिक्षक सध्याच्या या इंग्रजी शाळेच्या स्पर्धेमध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहेत त्यामुळे वीटची शाळा ही तालुक्यामध्ये एक ते चार च्या शाळेमध्ये सर्वोत्कृष्ट व उत्तम गुणवत्तापूर्ण शाळा आहे. गेल्या महिन्यात सांघिक नृत्य स्पर्धेमध्ये या शाळेने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या शाळेला गेल्या दोन वर्षांमध्ये लाभलेले मुख्याध्यापक काका घाडगे सर, अर्जुन ढेरे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या आर्थिक आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या नियोजनामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट या शाळेला गतवैभव प्राप्त झालेले आहे.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या उक्तीप्रमाणे वीटच्या शाळेमध्ये लाल माती व अनेक वेगवेगळ्या प्रकारची हजारो झाडे लावलेले आहेत. त्यामुळे शालेय परिसर अगदी मुलाप्रमाणे फुलून दिसत आहे. या शाळेला लाभलेले अनेक गुणवंत शिक्षक चांगल्या पद्धतीचे उपक्रम वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये या शाळेतील अनेक विद्यार्थी चमकलेले आहेत.

सांघिक खेळात प्रथम व समुह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे गावातून या विद्यार्थ्यांचे व शिक्षक बांधवांचे कौतुक अभिनंदनचा वर्ष होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *