करमाळा प्रतिनिधी

दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्त ग्रंथालय विभागात एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी ग्रंथालय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या रीडिंग क्लब व बेस्ट रीडर पुरस्कार उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन, स्वअध्ययन आणि ग्रंथालयाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रंथपाल अमोल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *