करमाळा प्रतिनिधी

शालेय क्रीडा स्पर्धा म्हणजे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध खेळांच्या स्पर्धा, ज्यामध्ये धावणे, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल यांसारखे खेळ असतात.

श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये annual sports day म्हणजेच वार्षिक क्रिडा दिन उत्साहात संपन्न झाला आहे. मुलांचे विविध खेळ घेण्यात आले.

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष जयंत दळवी व स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी रनिंग, लिंबू चमचा, क्रिकेट, फुटबॉल, आदी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षक कर्मचारी वृंद यांनी केले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *