
करमाळा प्रतिनिधी
आज रयत क्रांती शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती संघटना यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी माढा विभाग, कुर्डूवाडी मुंडे मॅडम, तसेच तहसील कार्यालय करमाळा ऑफिस येथे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, लोकरे यांना करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व अवकाळी पावस मुळे सर्व भागातील सरसकट पंचनामा करून अटी शर्ती न लावता तातडीची नुकसान भरपाई व सरसकट कर्जमाफी करावी असे निवेदन देण्यात आले.

करमाळा माढा तालुक्यातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारी बाजूने अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने शेतकरी, शेतमजूर अत्यंत हातबल झाला असून ऊस केळी, द्राक्ष, मका, टॉमेटो, डाळिंब, कांदा असे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच घरांची पडझड झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. संपूर्ण पिकामध्ये पाणीच शेतामध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न भंग झाले. असून या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आधीच शेतकरी वर्ग कर्ज बाजारी झाला असून या सरकारने कोणत्याही पिकांना हमीभाव मिळत नाही. सरकारने दिलेले आश्वासन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री गप्प आहेत. महाराष्ट्रामध्ये सरकार शेतकऱ्यांचा वाटा ७% टक्के आहे. आणि नोकरी दरांचा वाटा ३५% आहे शेतकरी वर्ग हा अनधान्य पिकवणारा पोशिंदा असून देखील शेतकरी वर्ग बळीराजा या महाराष्ट्रातील सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना हमीभाव व सरसकट कर्जमाफी, वाहतुकी रस्ते, याच्यावर सर्वात जास्त निधीचा वाटा देऊन लवकर या महाराष्ट्रातील सरकारला सद्बुद्धी देवो व सोलापूर जिल्हातील करमाळा, माढा व प्रत्येक तालुक्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून जनावरे, घरे व शेतीच्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन सरसकट मदत देण्यात यावी हि प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या व रयत क्रांती तरी संघटनेच्या वतीने विनंती. करण्यात आले त्यावेळी उपस्थित. प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेठ जगदाळे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, राजकुमार सरडे, प्रहार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, शेतकरी नेते विठ्ठल आबा मस्के, प्रहार माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, रयत क्रांती करमाळा तालुका अध्यक्ष शिवशंकर जगदाळे, अजय बागल, जयंतीलाल संचेती, तुषार शिंदे, बाळासाहेब गायकवाड, काका काकडे, भिवाजी वाघमोडे ,तानाजी यादव, पोपट पारखे, इतर सर्व प्रहार संघटनेचे व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,शेतकरी, शेतमजूर, बांधव उपस्थित होते.