
करमाळा प्रतिनिधी
श्रीदेवीचा माळ येथे सालाबाद प्रमाणे नवरात्र महोत्सव निमित्त आयोजित कमलाई फेस्टिवल राज्यस्तरीय डान्स स्पर्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन कमला फेस्टिवल कमिटी यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे व राजेराव रंभा तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून डान्स स्पर्धकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच करमाळा तालुक्यातील व राज्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. डान्स स्पर्धेबरोबर अनेक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त कमलाई फेस्टिवलच्या वतीने तालुक्यातील काही मान्यवरांना राजे रावरंभा तरुण मंडळाच्या वतीने काही सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, गुणगौरव विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा असे आयोजन कमिटी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
