
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेमधून समाजसेवकांची निर्मिती होते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना हिंदी विभाग प्रमुख डॉ. अनिल साळुंखे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात ज्या उद्देशाने झाली तो उद्देश विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा व बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने समाज सेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी डॉ. साळुंखे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील सर हे लाभले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामधून सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण भागामध्ये काय समस्या आहेत याची जाणीव करून घ्यावी आणि त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधीर मुळीक यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा आरणे या विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन रोहित खरात या विद्यार्थ्याने केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.