
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिकेने गणेश विसर्जन दिवशी गोळा केलेल्या गणेशमूर्ती विसर्जन विना नगरपालिकेच्या हिरकणी कक्षात कुलूप बंद होत्या हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष (उद्धव ठाकरे) संजय शिंदे व शहर उपाध्यक्ष संतोष गांनबोटे हे लगेच नगरपालिकेच्या कार्यालयात गेले तर त्यांना ही गोष्ट दिसली त्यांनी वरिष्ठांना विचारले असता आम्ही लवकरच विसर्जन करणार असल्याचे सांगितले परंतु विसर्जनाचा दिवस तर गेला हे लक्षात आणून दिल्यानंतर तो अधिकारी म्हणाला की आजच आम्ही सात विहीर मध्ये विसर्जन करतो मग विहिरीत विसर्जन करावयाचे होते मग लोकांनी विसर्जन केले असते. यावेळी पदाधिकारी यांनी सांगितले की, तुम्ही आज नाही केले तर आम्ही त्या मुर्त्या आम्ही वाजतगाजत मिरवणूक काडून त्या विसर्जन करतो हा इशारा दिला.

यानंतर अवघ्या तासाभरात सर्व मुर्त्या सातविहिरीतच विसर्जित केल्या शहरातील नागरिकांनी मोठया भक्तीभावाने ह्या मुर्त्या नगरपालिकेच्या हवाली केल्या होत्या परंतु नगरपालिकेने मात्र त्या एका खोलीत बंद करून ठेवल्या होत्या यामुळे करमाळा शहरात याबाबत चीड निर्माण झाली आहे.