
करमाळा प्रतिनिधी
जि.प.प्रा. शाळा भांगेवस्ती कंदर येथे दि. ८ सप्टेंबर रोजी नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत साक्षरता सप्ताह व सखी सावित्री समिती बैठक यांचे आयोजन केलेले होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून धन्यकुमार सुरवसे पोलीस पाटील कंदर हे होते. यावेळी FLNAT परीक्षा उत्तीर्ण नवसाक्षरांचा गुणपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. साक्षरतेचे महत्व सांगणारा लघुपट दाखवण्यात आला. मुलींच्या समस्या व अडचणींवर उपाय याविषयी शेख मॅडम यांनी मार्गदर्शन केले. मुलींचे हक्क सामाजिक स्थान व महिला विषयक कायदे याविषयी पोलीस पाटील सुरवसे यांनी विवेचन केले. उपशिक्षक नितीन शिंदे सर यांनी आरोग्यदायी सवयी व आहार व्यवस्थापन याविषयी आपले मत मांडले. सर्व पालक ग्रामस्थ माता नवसाक्षर नवप्रवेशित असाक्षर स्वयंसेवक अंगणवाडी कर्मचारी यांनी साक्षरता परिसंवाद चर्चेमध्ये सहभाग घेतला. मुख्याध्यापक सखाराम राऊत यांनी आभार मानले.
