
करमाळा प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश भोसले यांचा सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचा नुकताच ‘विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४’ मिळाला आहे.

पर्यवेक्षक रमेश मुरलीधर भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी घेतलेले विशेष परिश्रम, विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यासाठी केलेले उत्कृष्ट कार्य इ. ची दखल घेत सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाने ‘आदर्श विज्ञान शिक्षक पूरस्कार – २०२४’ दिला आहे. हा पुरस्कार सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या १२ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये

वितरीत करण्यात आला. त्यामुळे महात्मा गांधी प्रशालेच्या लौकिकात भर पडली आहे. बाजार समिती कार्यालयात मा.आ. जयवंतराव जगताप यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संचालक दादासाहेब कोकरे, अमृत कटरिया भाऊसाहेब, तालुका सोसायटी चे माजी संचालक भाऊसाहेब बुधवंत, अनिसचे माने भाऊसाहेब, दिगंबर रासकर आदी उपस्थित होते.