करमाळा प्रतिनिधी

महात्मा गांधी ज्यूनियर कॉलेज ऑफ सायन्स ची माजी विद्यार्थिनी मौजे केम येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मयूरी सुरेश दोंड हीची मुंबई पोलीस पदी नुकतीच निवड झाली आहे. २०२१ मध्ये मयूरी करमाळा शहरातील महात्मा गांधी ज्यूनियर कॉलेज मधून विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाली. त्यानंतर बी.एससी. चे शिक्षण घेत असताना अधून मधून खाक्या

वर्दीचं आकर्षण वाटू लागलं अन् मागच्या वर्षीच सर्वात लवकर स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी पोलीस भरती व्हायचं तीनं ठरवलं. जबर इच्छाशक्ती अन् चिकाटीच्या जोरावर यावर्षी शेतकरी बापानं शिक्षण दिल्याचं चीज करून दाखवायचं ठरवलं अन् सुरु केला अभ्यास. फिजीकलच्या व लेखी परीक्षेच्या योग्य तयारी साठी ३ -४ महीने अकॅडमी जॉईन केली. अन्

फक्त १ वर्षात १३५ गुण घेवून मुलांच मेरीट घेवूनी मुंबई पोलीस पदाला गवसणी घातली. पुढे जनसेवा करत खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक होवून अधिकारी होण्याचा तिचा मानस आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने या यशाचे श्रेय तिचे आई – वडील व मार्गदर्शकांना दिले आहे. इतरांसाठी तीचे हे आदर्श उदाहरण ठरले आहे. मा.आ. जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त तथा बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप, प्राचार्य बी.के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक रमेश भोसले, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमूख विजय पवार, आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *