करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या राजुरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचे सतीश रंगनाथ शिंदे यांची फेर निवड झाली.

काल दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजुरी चे ग्रामविकास अधिकारी रामेश्वर गलांडे व राजुरी ग्रामपंचायत च्या सरपंच सोनाली राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी विजयी उमेदवार सतीश रंगनाथ शिंदे यांना सात मते तर विरोधी उमेदवार शरद भागवत मोरे यांना पाच मते पडली.

विद्यमान उपसरपंच सतीश रंगनाथ शिंदे यापूर्वी नारायण आबा पाटील गटाचे समर्थक होते. परंतु आता त्यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यापूर्वी ही सतीश शिंदे हे उपसरपंच होते. संजय मामा शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी पुन्हा उपसरपंच पद मिळवले आहे.

या निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बंडू कुंडलिक टापरे, मैना छगन जाधव, शरद भागवत मोरे, वंदना राजेंद्र गायकवाड, सतीश रंगनाथ शिंदे, विद्या अमोल दुरंदे, सुनीता महादेव अडसूळ, रवींद्र गरुड, जयश्री विठ्ठल देशमुख, राजाबाई गोविंद दुरंदे, सतीश अर्जुन साखरे यांच्यासह आर. आर. बापू साखरे,  आबासाहेब टापरे,  उदय साखरे, आकाश झोळ, नंदकुमार जगताप, नवनाथ दुरंदे, नामदेव जाधव, आप्पा निरगुडे, आप्पा साखरे ,बंडू फरांडे, गणेश शिंदे, भाऊसाहेब जाधव, अमोल साखरे, तुषार मोरे, अशोक गरुड उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *