ब्राह्मण महिला संघ करमाळा च्या वतीने हळदी कुंकु व तिळगुळ वाटप संपन्न !
करमाळा प्रतिनिधी
येथील श्री राममंदीर किल्ला विभाग या ठिकाणी काल रोजी ब्राह्मण महिला संघाच्या वतीने हळदी कुंकु समारंभ व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला ! उपस्थित महिलांचे स्वागत महिला संघाच्या कार्यकारिणी सदस्यांनी केले ! ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा निलिमा अनिल पुंडे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून महत्वाच्या विषयांवर चर्चा केली . सर्व महिलांना हळदीकुंकु, तिळगुळ व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले . यावेळी 40 ते 50 महिला उपस्थित होत्या . यावेळी संघातील ज्येष्ठ महिलांनी भजन, अभंग व गौळणी सादर केल्या . कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला . ! कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला संघाचे अध्यक्ष निलिमा पुंडे, उपाध्यक्ष स्वाती मसलेकर, खजिनदार आरती सूर्यपुजारी, सचिव ज्योती कुलकर्णी, सहसचिव शुभांगी खळदकर, संपर्क प्रमुख सारीका पुराणिक व सदस्या ज्योती रामनवमी वाले यांनी परिश्रम घेतले !