दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये भारताचा  ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

करमाळा प्रतिनिधी

 २६ जानेवारी २०२५  रोजी दत्तकला शिक्षण संस्थेच्या प्रांगणात भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि आनंदात पार पडला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  रामदास झोळ सर,  उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ मॅडम, संस्थेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी प्रा.  विशाल बाबर सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ,मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलत असताना आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  रामदास झोळ सर यांनी भारताच्या  औद्योगिक ,शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला.  त्याचबरोबर आजच्या स्पर्धेच्या युगात  विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असा संदेशही विद्यार्थ्यांना दिला. आजच्या दिवसाचे औचित्य साधून  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला मान्यवरांसह दत्तकला शिक्षण संस्थेतील  सर्व विभागांचे प्राचार्य , विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशा रीतीने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *