*करमाळा बाजार समितीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा :-*
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७६ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी बाजार समितीचे उपसभापती सौ शैलजा बबनराव मेहेर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी सोलापूर जिल्हा गट सचिवांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बबनराव मेहेर, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे, व अन्य कर्मचारी वृंद उपस्थित होते .