करमाळा प्रतिनिधी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी ता. करमाळा जि. सोलापूर करमाळा माढा विधानसभेचे आमदार नारायण आबा पाटील यांनी राजमाता गोमातेचे पूजन केले. यावेळी गोशाळेचे अध्यक्ष ह. भ. प. अण्णासाहेब सुपनवर, संस्थेचे सचिव शहाजी शिंदे, शिवाजी नरुटे, राम भाऊ शिंदे, दत्तात्रय सुपनवर, ह. भ. प. रामचंद्र वाघमोडे, ह. भ. प. अंकुश लांडगे, निलेश वाघमोडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोआधारित सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केलेला आहे. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजमाता गोमातेचे पूजन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सर्व शेतकऱ्यांनी गोआधारित सेंद्रिय शेती करून आपले आरोग्य सदृढ व निरोगी ठेवावे अति रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून कॅन्सर सारखे आजार आपल्या देशामध्ये पसरत चाललेला आहे. त्याला आळा घालण्यासाठी राजमाता गोमातेचे गोमूत्र शेण यापासून गोकृपा अमृत जीवामृत दंतमंजन साबण नस्य डोळ्याचे आयुर्वेदिक औषध वापरून आपलं शरीर सदृढ व निरोगी ठेवावे करमाळा तालुक्यामध्ये गोआधारित सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन कार्यशाळा घेऊन सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेला सर्वतोपरीच मदत/सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन शेतकऱ्यांनी देशी गोवंश पालनाकडे वळावे संकरित गाई च्या दुधापासून कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अती कीटकनाशक फवारल्यामुळे फळ पालेभाज्या वर दुष्परिणाम होऊ लागलेले आहेत त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. यावेळी संस्थेच्या वतीने आमदार नारायण आबा पाटील यांचा सत्कार दत्तात्रय सुपनवर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. आभार संस्थेचे सचिव शहाजी शिंदे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *