करमाळा प्रतिनिधी

करमाळा श्रीसंत नामदेव शिंपी समाज अध्यक्ष, विश्वस्त, सचिव, संपर्क प्रमुख,ज्येष्ठ समाज नागरीक, महिला, शिंपी समाज बंधू आणि भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हरिनाम सप्ताह व श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार यांचे सहजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे.

यावेळी काल्याचे किर्तन ह.भ.प. बळीराम महाराज वायकर रा. पाडळी यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण तयार करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

श्रीसंत नामदेव शिंपी महाराज आणि परिवार संजीवन समाधी सोहळा दिनांक ११/०८/२०२६ रोजी संपन्न झाला. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन कै. अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ प्रशांत गाठे व प्रवीण गाठे व गाठे परिवार यांच्या कडून करण्यात आले होते. श्री संत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळा सन २०२७ चे महाप्रसाद अन्नदानाचे यजमान हे श्रीराम बुलबुले (गुरुजी) हे असणार आहेत. याच दिवशी शिंपी समाजातील कष्टाळु होतकरू महिला यांचा सन्मान शिंपी समाजाच्या वतीने पुष्पा वादवणे व कैलास वादवणे करमाळा यांच्या वतीने करण्यात आला.

तसेच या दिवशी श्रीसंत नामदेव महाराज प्रतिमेवर पुष्प वर्षाव होऊन करमाळा शहराच्या प्रमुख मार्गावरून बँड पथकासह महिलांची टाळकरी दिंडी एका पोशाखातील निघाली होती. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील सर्व भाविक    वेळात वेळ काढून उपस्थित होते.

या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व धार्मिक कार्यक्रम शिंपी समाज महिलांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री संत नामदेव महाराजांची पूजा-आरती गाठे परिवाराच्या वतीने गौरी गाठे, वैष्णवी गाठे, स्वरा गाठे, आधिरा प्रविण गाठे यांच्या हस्ते करण्यात आली. पाच महिलांचा सत्कार सुद्धा पुष्पा कैलास वादवणे यांच्या हस्तेच करण्यात आला. पुष्पा वादवणे यांचा सत्कार रेणुका गाठे यांच्या हस्ते करण्यात आला.

श्रीसंत नामदेव महाराज व परिवार संजीवनी समाधी सोहळा 2027 यजमानपद हे श्रीराम बुलबुले गुरुजी हे असणार आहेत. यानिमित्त त्यांचा सुद्धा सत्कार योगिता बुलबुले यांचा सत्कार आरती गाठे व मनिषा वनारसे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सोहळा साजरा करण्यामध्ये महिलांचाच सहभाग दिसून आला. असे आगळे वेगळे वैशिष्ट्य प्रथमच दिसून आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *