
करमाळा प्रतिनिधी
सन 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगावच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सातवी मधील चार विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात मेरिट लिस्ट मध्ये आले असून. त्यामध्ये प्रज्वल युवराज पवार यांनी 218 गुण मिळवून ग्रामीण भागात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर आरोही महादेव मस्तूद हिने 210 गुण मिळवत गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक विलास चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टाचे विद्यार्थ्यांना फळ मिळाले त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य, ग्रामस्थ, पालक यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस

हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करणारे शाळेचे मुख्याध्यापक उमेश कानडे सर, सतीश सूर्यवंशी सर, अशोक चव्हाण सर, पल्लवी कुलकर्णी मॅडम यांचेही या यशाबद्दल विशेष कौतुक होत आहे. गुणवत्ता पूर्ण यशासाठी करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, केंद्राचे केंद्रप्रमुख स.पा. मुंडे सर, शिक्षण विस्तार अधिकारी टकले यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीच्या या यशामुळे घारगाव शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक ग्रामस्थांमधून होत आहे.