
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील कै. आण्णासाहेब जगताप विद्यालय येथे मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशन यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दिन शेख यांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.

कर्मवीर अण्णासाहेब विद्यालय येथे १५ आगस्ट निमित्ताने शाळेच्या परिसरातील साफसफाई करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल जाधव सर, आकुंश खाने सर, जगदाळे सर, विजय धनवे सर, जितेश कांबळे सर, शुभम पाटील सर, मुस्लीम समाजाचे युवा नेते तथा मौलाना अबुल कलाम आझाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख (आल्लु शेठ), उपाध्यक्ष वाजीद शेख, सचिव मजहर नालबंद, मतीन शेख, आलीम शेख, सादीक, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मजहर शेख, उपाध्यक्ष मतीन शेख, खजिनदार आलीम शेख,सद्दम मुलानी व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. विशेष सहकार्य शाळेचे मुख्याध्यापक सुनिल जाधव सर यांचे मिळाले.