करमाळा प्रतिनिधी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात झरे विद्यालयाचा अभिजीत राऊत तालुक्यात प्रथम

५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. २३/१२/२४ ते २४/१२/२४ या रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय कोर्टी येथे संपन्न झाले यामध्ये नामदेवराव जगताप विद्यालय झरे या विद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत राऊत या विद्यार्थ्याचा इयत्ता ९ वी ते १२ या मोठ्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्याने प्रदर्शनात स्वयंचलित सिंचन पद्धती व पाण्याचा निचरा करणारी प्रभावी पध्दती यामध्ये संशोधन करुन प्रयोग सादर केला. त्यांच्या या संशोधनाची जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे गटशिक्षणाधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब संस्था अध्यक्ष श्री बन्सी आबा घाडगे यांनी अभिनंदन केले. या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षिका सौ. वैशाली राजमाने मॅडम व गणित शिक्षक श्री धनंजय चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *