
करमाळा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्रीकांत भारतीय, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे संयुक्त पत्रा द्वारे भाजपा ओबीसी मोर्चाच्या “प्रदेश सचिव” पदी गणेश मोहन कराड यांची निवड केली.

खरतर माझ्या साठी हि गोष्ट फार आनंद देणारी आहे. मी माझ्या आजवरच्या प्रवासात पक्षा प्रति शक्य तेवढ काम केल आहे पण आता मला मार्ग दिसला आहे. यापुढे सर्वसमावेशक राजकारण करत असतांना महाराष्ट्रातील सर्व सामान्य ओबीसी वर्गाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जोडण्यासाठी मी कटिबध्द राहील. असे नुतन प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचे गणेश मोहन कराड यांनी सांगितले आहे

